दुचाकीवरून 121 देशी दारूच्‍या बाटल्‍या चालवल्या होत्‍या… मध्येच ‘गडबड’ झाली…!; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशी दारूच्या 121 बाटल्या मोटारसायकलवरून नेणाऱ्यास शेगाव ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून मोटारसायकलसह 48640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कालखेड फाटा (ता.शेगाव) येथे आज, 30 एप्रिलला दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली. काशिनाथ देविदास दाने (53, रा. खिरोडा ता.संग्रामपूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरिक्षक नीलेश …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देशी दारूच्‍या 121 बाटल्‍या मोटारसायकलवरून नेणाऱ्यास शेगाव ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्‍याच्‍या ताब्‍यातून मोटारसायकलसह 48640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कालखेड फाटा (ता.शेगाव) येथे आज, 30 एप्रिलला दुपारी साडेचारच्‍या सुमारास करण्यात आली.

काशिनाथ देविदास दाने (53, रा. खिरोडा ता.संग्रामपूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरिक्षक नीलेश साहेबराव डाबेराव यांनी याप्रकरणात त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. दाने हा त्‍याच्‍याकडील मोटारसायकलवरून देशी दारूच्‍या 3630 रुपयांच्‍या बाटल्‍या विनापरवाना घेऊन जात होता. त्‍याच्‍या तोंडाला मास्‍कही नव्‍हता. ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंह चव्हाण, कॉन्स्टेबल मुकेश पवार करत आहेत.