दुचाकीवर गुटख्याची करायचा गावोगाव विक्री; पोलिसांनी घातली झडप!; नांदुरा तालुक्‍यात कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलवर बंदी घातलेल्या गुटख्याची वाहतूक करत खेडोपाडी विकणाऱ्याला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई काल, 18 मार्चला सकाळी निमगाव (ता. नांदुरा) फाट्यावर करण्यात आली. त्याच्याकडून 19 हजारांचा गुटखा व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 43 हजार 987 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेख नवाज शेख हुसेन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलवर बंदी घातलेल्या गुटख्याची वाहतूक करत खेडोपाडी विकणाऱ्याला अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई काल, 18 मार्चला सकाळी निमगाव (ता. नांदुरा) फाट्यावर करण्यात आली. त्‍याच्‍याकडून 19 हजारांचा गुटखा व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 43 हजार 987 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेख नवाज शेख हुसेन (रा. नांदुरा) हा त्याच्या दुचाकीवर (क्र. एमएच 28 एडब्ल्यू 9547) अवैध गुटख्याची वाहतूक करत खेडोपाडी विक्री करत असल्याची माहिती अन्‍न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागाचे अन्‍न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके व त्यांच्या पथकाने निमगाव फाट्यावर सापळा रचला. दिसताच क्षणी त्‍याच्‍यावर झडप घातली.  त्‍याच्‍याकडून 11,781 रुपयांचा विमल गुटखा, 2076 रुपयांची सुगंधीत तंबाखू, 4560 रुपयांचा वाह पानमसाला, 570 रुपयांचा डबू चेविंग टोब्याको असा 18987 रुपयांचा गुटखा व मोटारसायकल असा एकूण 43 हजार 987 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.