दुचाकीस्वारांना उडवून बोलेरो पिकअपची धूम… जळगाव जामोद तालुक्यातील घटना

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बोलेरो पिकअपने समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले. घटना घडल्यानंतर पिकअप चालकाने पळ काढल्याची घटना 13 जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास बर्हाणपूर- जळगाव जामोद रस्त्यावरील तीनखुटी-निमखेडीदरम्यान फॉरेस्ट चौकीजवळ घडली. ठेकेदारी करणारे नरेश पूनम बग्गन (27, रा. शिवाजीनगर, शेगाव) व त्यांचे काका अर्जुन रामदास …
 

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बोलेरो पिकअपने समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले. घटना घडल्यानंतर पिकअप चालकाने पळ काढल्याची घटना 13 जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास बर्‍हाणपूर- जळगाव जामोद रस्त्यावरील तीनखुटी-निमखेडीदरम्यान फॉरेस्ट चौकीजवळ घडली.

ठेकेदारी करणारे नरेश पूनम बग्गन (27, रा. शिवाजीनगर, शेगाव) व त्यांचे काका अर्जुन रामदास बग्गन अपघातात जखमी झाली आहेत. नरेश हे आई-वडिलांसह राहतात. शेगाव नगरपरिषदेत ते ठेकेदारी करतात.12 जानेवारीला ते त्यांचे काका अर्जुन बग्गन यांच्यासोबत जावळाच्या कार्यक्रमाकरिता खैराती बाजार (मध्यप्रदेश ) येथील नातेवाईकांकडे दुचाकीने गेले होते. 13 जानेवारीला सकाळी परतत असताना साडेनऊच्या सुमारास फॉरेस्ट चौकीजवळ जळगाव जामोदकडून बर्‍हाणपूरकडे जाणार्‍या बोलेरो पिकअपने (क्र.एम पी.09 जी.एच.2333) त्यांना समोरून उडवले. यात दोघेही दुचाकीवरून पडले. मोटारसायकलचेही बरेच नुकसान झाले. पिकअपचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. जळगाव जामोद येथील नातेवाईक अनिल खरे यांना मोबाइल फोनवरून घटना सांगितल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दोघांवर उपचार करण्यात आले.