दुचाकीस्‍वाराला लुटणाऱ्या अट्टल गुन्‍हेगाराच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; एलसीबीची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडून 5 हजार रुपये लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, 14 फेब्रुवारीला अटक केली. गणेश भारत फोलाने (30, रा. संभाजीनगर , चिखली) असे अटक करण्यात आलेल्य आरोपीचे नाव आहे. त्याच्या चौकशीतून आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी 3 मे रोजी श्रीकृष्ण मधुकर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडून 5 हजार रुपये लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने आज, 14 फेब्रुवारीला अटक केली. गणेश भारत फोलाने (30, रा. संभाजीनगर , चिखली) असे अटक करण्यात आलेल्य आरोपीचे नाव आहे. त्‍याच्‍या चौकशीतून आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी 3 मे रोजी श्रीकृष्ण मधुकर सोळंकी (29, रा. कोलारा) हे रात्री 8:45 वाजता चिखलीवरून घरी जात असताना कृषी उत्पन्‍न बाजार समितीजवळ एकाने त्यांच्या गाडीला अडविले आणि गायछापची मागणी केली. तेवढ्यात मागून दोन मोटारसायकल आल्या व तू आमच्या गाडीला कट का मारला, असे म्हणत वाद घातला. श्रीकृष्ण सोळंकी यांच्या खिशातून जबरदस्ती 5 हजार रुपये काढून फरार झाले होते. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
आज, या घटनेतील आरोपी हा संभाजीनगरात असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. एलसीबीने तिथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्‍याला चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, ना.पो.काँ. दीपक पवार, गजानन चतुर, पो.काँ. विजय सोनोने, नदीम शेख यांनी पार पाडली.