दुचाकी घसरून पत्नीचा जागीच मृत्यू; पती, मुलगा गंभीर जखमी, देऊळगाव राजा तालुक्यातील दुर्घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर पती आणि मुलगा गंभीर झाले. ही घटना काल, २६ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास देऊळगाव मही- देऊळगाव राजा रोडवरील रोहणा फाट्याजवळ घडली. अर्चना सुनील राठोड (२५, रा. वाघाळा, ता. सिंदखेडराजा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सुनील उत्तम राठोड (२९) …
 
दुचाकी घसरून पत्नीचा जागीच मृत्यू; पती, मुलगा गंभीर जखमी, देऊळगाव राजा तालुक्यातील दुर्घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात पत्‍नीचा जागीच मृत्‍यू तर पती आणि मुलगा गंभीर झाले. ही घटना काल, २६ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास देऊळगाव मही- देऊळगाव राजा रोडवरील रोहणा फाट्याजवळ घडली. अर्चना सुनील राठोड (२५, रा. वाघाळा, ता. सिंदखेडराजा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

सुनील उत्तम राठोड (२९) व त्यांचा मुलगा उमेश सुनील राठोड (९) दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. राठोड दाम्‍पत्‍य पंढरपूरला (जि. सोलापूर) येथे मजुरी करतात. कौटुंबिक कारणासाठी ते घरी मोटारसायकलीने येत असताना ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे डॉक्टर अक्षय गट्टे व चालक यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह व जखमींना रुग्णालयात आणले. प्रथमोपचार केल्यानंतर जखमींना जालना येथे हलविण्यात आले.