दुचाकी घसरून पत्नी ठार, पती जखमी; माळवंडीजवळील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकी घसरून झालेल्या अपघातात 32 वर्षीय महिला ठार झाली. ही घटना आज, 22 फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास माळवंडी (ता. बुलडाणा) जवळ घडली. अनिता गणेश सोनुने (रा. अन्वा, जि. जालना) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गणेश सोनुने (रा. अन्वा, जि. जालना) हे पत्नीला घेऊन साखळी (ता. बुलडाणा) …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुचाकी घसरून झालेल्या अपघातात 32 वर्षीय महिला ठार झाली. ही घटना आज, 22 फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास माळवंडी (ता. बुलडाणा) जवळ घडली.

अनिता गणेश सोनुने (रा. अन्‍वा, जि. जालना) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गणेश सोनुने (रा. अन्‍वा, जि. जालना) हे पत्‍नीला घेऊन साखळी (ता. बुलडाणा) येथे येत होते. दरम्यान माळवंडी गावाजवळ दुचाकी घसरून दोघेही गाडीवरून पडले. यात त्यांच्या पत्नी अनिताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी अनिता सोनुने यांना मृत घोषित केले तर गणेश सोनुने यांच्यावर उपचार सुरू आहेत.