दुचाकी चोरून चालवली होती लोटत… एकाने मालकाला बोलावून केला ‘पंचनामा’!; मोताळा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर उभी दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नातील एकाला रंगेहात पकडण्यात आले. ही घटना मोताळा तालुक्यातील शेलापूर येथे 1 मार्चच्या रात्री घडली. विनायक काशिनाथ दांडगे (रा. आदरखेड, ता. जाफराबाद) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याला बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.1 मार्चच्या रात्री शेलापूर येथील दीपक समाधान बोरसे यांची त्यांनी घरासमोर उभी केलेली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरासमोर उभी दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नातील एकाला रंगेहात पकडण्यात आले. ही घटना मोताळा तालुक्यातील शेलापूर येथे 1 मार्चच्या रात्री घडली. विनायक काशिनाथ दांडगे (रा. आदरखेड, ता. जाफराबाद) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याला बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
1 मार्चच्या रात्री शेलापूर येथील दीपक समाधान बोरसे यांची त्यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी (क्र. एमएच 27 वाय 8297) मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरटा लोटत घेऊन जात होता. ही बाब गावातीलच गजानन वाघ यांना दिसली. त्यांनी लगेच दुचाकी मालकाला आवाज देऊन नागरिकांच्या मदतीने चोरट्यास रंगेहात पकडले. प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊन चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.