दुचाकी स्लीप होऊन गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकल स्लीप होऊन जखमी झालेल्या युवकावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा मृत्यू झाला असून, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आल्याने पोलिसांनी आज आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विशाल सोपान राखुंडे (25, रा. धानोरा विटाळी, ता. नांदुरा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. खामगाव-बुलडाणा रस्त्यावरील …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकल स्लीप होऊन जखमी झालेल्या युवकावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा मृत्यू झाला असून, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आल्याने पोलिसांनी आज आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विशाल सोपान राखुंडे (25, रा. धानोरा विटाळी, ता. नांदुरा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. खामगाव-बुलडाणा रस्त्यावरील वाघळी फाट्याजवळ हा अपघात 6 डिसेंबरला झाला होता. तब्बल महिनाभर त्याच्यावर उपचार सुरू होेते. विशालची दुचाकी स्लीप होऊन त्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला आधी खामगाव, नंतर अकोला व नंतर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपास पोहेकाँ शेख हमीद करत आहेत. एएसआय आनंद वाघमारे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घेतली.