दुधाचे पाऊच आणायला गेलेली 19 वर्षीय तरुणी परतलीच नाही…; जिल्ह्यातून 3 तरुणी बेपत्ता

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुधाचे पाऊच आणते असे सांगून घराबाहेर पडलेली 19 वर्षीय तरुणी परतलीच नसल्याची बाब खामगाव शहरातील घाटपुरीत समोर आली आहे. गीता लालसिंग राठोड ही 12 जूनला सकाळी 11 पासून गायब आहे. तिच्या नातेवाइकांनी परिसरात, नातेवाइकांकडे शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. अखेर तिच्या आईने सौ. कुसुम लालसिंग राठोड यांनी शिवाजीनगर …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुधाचे पाऊच आणते असे सांगून घराबाहेर पडलेली 19 वर्षीय तरुणी परतलीच नसल्याची बाब खामगाव शहरातील घाटपुरीत समोर आली आहे. गीता लालसिंग राठोड ही 12 जूनला सकाळी 11 पासून गायब आहे. तिच्‍या नातेवाइकांनी परिसरात, नातेवाइकांकडे शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. अखेर तिच्या आईने सौ. कुसुम लालसिंग राठोड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दिली आहे. तपास ना.पो.काँ. श्री. मोठे करत आहेत.

मलकापूर, नांदुऱ्यातूनही तरुणी बेपत्ता
मलकापूर येथील महाकालीनगरातील 21 वर्षीय प्राजक्‍ता सुभाष पाटील आणि नांदुरा तालुक्‍यातील कोकलवाडी येथील 19 वर्षीय रेणुका धीरसिंह राजपूत या दोन तरुणी घरातून निघून गेल्याची तक्रार अनुक्रमे मलकापूर शहर आणि नांदुरा पोलीस ठाण्यात काल, 13 जूनला दाखल झाल्या आहेत.