दुपारी साडेतीनपर्यंत मतदान करणार्‍यांचा आकडा 6 लाखांच्या पल्याड! महिलांची आघाडी कायम

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 498 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज सुरू असलेल्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यात दुपारी साडेतीनपर्यंत 6 लाखांवर मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली. या टप्प्यांतही 8 तालुक्यांतील महिला मतदानात आघाडीवर असल्याचे दिसून आले. आज सकाळी 7ः30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या 2 तासांत संथगतीने झालेले मतदान वगळले तर नंतर मतदानाची गती वाढतच …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 498 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज सुरू असलेल्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यात दुपारी साडेतीनपर्यंत 6 लाखांवर मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली. या टप्प्यांतही 8 तालुक्यांतील महिला मतदानात आघाडीवर असल्याचे दिसून आले. आज सकाळी 7ः30 वाजता मतदानाला सुरुवात झाली.

पहिल्या 2 तासांत संथगतीने झालेले मतदान वगळले तर नंतर मतदानाची गती वाढतच गेली. दुपारी 3ः30 वाजेपर्यंतच हा आकडा 63. 84 टक्क्यांपर्यंत पोहोचला. एकूण 9 लाख 70 हजार 667 पैकी 6 लाख 19 हजार 635 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये 64.53 टक्क्यांसह रणरागिणी महिला (3 लाख 11 हजार 312) मतदार आघाडीवरच होत्या. यातुलनेत 63.15 टक्केवारीसह 3 लाख 8 हजार 323 मतदारांनी मतदान केंद्र गाठले. मोताळा, संग्रामपूर, लोणार, खामगाव, सिंदखेडराजा वगळता अन्य 8 तालुक्यांतील महिला मंडळ मतदानात आघाडीवर होते.

आमदार श्‍वेताताई महाले यांनी तोरणवाड्यात ग्रामपंचायतीसाठी मतदान

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्‍वेताताई महाले पाटील यांनी आज तोरणवाडा या त्यांच्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे पती विद्याधर महाले आणि परिवारातील सदस्यांनीही मतदान केले. 3 प्रभाग आणि 7 सदस्य संख्या असलेल्या तोरणवाडा ग्रामपंचायतींच्या 3 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने 4 जागांसाठी येथे मतदान होत आहे. 4 जागांसाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.