दुपारी 12 पर्यंत दुकाने उघडी ठेवायला परवानगी द्या; चिखलीच्या व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 13 नगर परिषद क्षेत्रात 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. त्याला व्यापारी संघटनेने विरोध दर्शवला असून, जिल्ह्याधिकाऱ्यांनी ज्या हेतूने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आदेश पारित केले आहेत. तो हेतू साध्य होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आधीच मोठे …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 13 नगर परिषद क्षेत्रात 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. त्याला व्यापारी संघटनेने विरोध दर्शवला असून, जिल्ह्याधिकाऱ्यांनी ज्या हेतूने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आदेश पारित केले आहेत. तो हेतू साध्य होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आधीच मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे दुपारी 12 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी निवेदन चिखलीच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
डीपीरोड व्यापारी असोसिएशन, चिखली यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्‍हटले आहे, की अनेक व्यापारी व व्यावसायिकांनी बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ द्यावी. त्यानंतर कडक संचारबंदी लावून रस्त्यावरील नागरिकांचा मुक्त संचार थांबवावा, असे निवेदनात म्‍हटले आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना डीपीरोड व्यापारी असोसिएशन चिखलीचे अध्यक्ष राकेश चोपडा, सचिव श्यामसुंदर खरपात,सदस्य प्रवीण भालेराव, उदय करवा, संगिता राजपूत उपस्‍थित होते.