दुर्दैवी घटना… विश्रांतीसाठी बोअरवेलच्या गाडीखाली झोपलेल्या मजुराचा चिरडून मृत्यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात बोअरवेलचे काम करून तो थकला. त्यामुळे विश्रांतीसाठी गाडीखालीच झोपी गेला अन् इथेच काळाने त्याचा घात केला. चालक गाडी रिव्हर्स घेत असताना तो चाकाखाली आला आणि चिरडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल, 23 एप्रिलला दुपारी दुधा (ता. बुलडाणा) शिवारात घडली. शिवभोज बसपती बैयगा (28, रा. चरखी, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतात बोअरवेलचे काम करून तो थकला. त्‍यामुळे विश्रांतीसाठी गाडीखालीच झोपी गेला अन्‌ इथेच काळाने त्‍याचा घात केला. चालक गाडी रिव्हर्स घेत असताना तो चाकाखाली आला आणि चिरडला गेला. यात त्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल, 23 एप्रिलला दुपारी दुधा (ता. बुलडाणा) शिवारात घडली. शिवभोज बसपती बैयगा (28, रा. चरखी, ता. देवसर, जि. सिंगरोली, छत्तीसगढ) असे या मजुराचे नाव आहे. दुधा शिवारातील गणेश कड यांच्या शेतात बोअरवेल घेण्याचे काम सुरू होते. काम करून थकलेला शिवभोज बोअरवेलच्या गाडीखालीच सावलीच्या आधाराने गाढ झोपला होता. दुपारी 4 च्या सुमारास चालकाने ट्रक रिव्हर्स घेतल्याने ट्रकचे चाक शिवभोज याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.