दुसरबीड येथे वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः वीज कर्मचारी, अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला दुसरबीडमधील वीज कर्मचाऱ्यांनी आज, 24 मे रोजी काळ्या फिती लावून काम करत पाठिंबा दिला. तिन्ही वीज कंपन्यांतील कायम, कंत्राटी, आऊटसोर्सिंग कर्मचारी जीवाची पर्वा न करता अखंडित वीजपुरवठा देण्याचे काम करत आहेत. तरीही शासनाने त्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा दिलेला नाही. …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः वीज कर्मचारी, अभियंत्‍यांच्‍या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला दुसरबीडमधील वीज कर्मचाऱ्यांनी आज, 24 मे रोजी काळ्या फिती लावून काम करत पाठिंबा दिला.

तिन्ही वीज कंपन्‍यांतील कायम, कंत्राटी, आऊटसोर्सिंग कर्मचारी जीवाची पर्वा न करता अखंडित वीजपुरवठा देण्याचे काम करत आहेत. तरीही शासनाने त्‍यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा दिलेला नाही. शासनाच्या कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. त्‍यामुळे आज आंदोलन करण्यात आले. कंत्राटी यंत्र चालक रहेमान कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली दुसरबीडमध्ये हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आप्पासाहेब मोगल, विवेक मुळे, शुभम चव्हाण, धनराज दुरबुडे यांच्यासह कर्मचारी, अभियंते सहभागी झाले.