दुसरे लग्‍न करण्यासाठी माजी सैनिकाकडून विवाहितेला बेदम मारहाण!; चिखलीतील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलिसांत दिलेल्या केसेस मागे घे म्हणून पतीने बेदम मारहाण केल्याने विवाहिता जखमी झाल्याची घटना चिखली शहरातील लुंबिनीनगरात समोर आली आहे. दुसरे लग्न करायचे म्हणून वारंवार शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यात सासरच्यांवरही आरोप केले असून, ते पतीला भडकावत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी पतीसह …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पोलिसांत दिलेल्या केसेस मागे घे म्‍हणून पतीने बेदम मारहाण केल्याने विवाहिता जखमी झाल्याची घटना चिखली शहरातील लुंबिनीनगरात समोर आली आहे. दुसरे लग्‍न करायचे म्‍हणून वारंवार शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचेही तक्रारीत म्‍हटले आहे. यात सासरच्यांवरही आरोप केले असून, ते पतीला भडकावत असल्याचे म्‍हटले आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध आज, १३ जुलैला गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. आशा महेंद्र राऊत (३४, रा. लुंबिनीनग, चिखली) या विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे, की तिचे लग्न २००७ मध्ये महेंद्र राऊतसोबत झाले. तिला दोन मुले आहेत. पती आर्मीमधून २०१९ मध्ये रिटायर्ड झाले आहेत. तुझ्या आई-वडील व भावाकडून पाच लाख रुपये घेउन ये, असे म्हणून ते नेहमी मारहाण करतात. तू मला नकोय. घरात राहू नको. मला दुसरे लग्‍न करायचे, असे ते म्‍हणतात. सासरे सुधाकर धोंडू राऊत, सासू सुमन सुध्दा माझ्या चारित्र्यावर संशय घेतात व शिविगाळ करतात. कंटाळून चिखली पोलीस ठाण्यात तीन तक्रारी केली आहेत. अमडापूर पोलीस ठाण्यात सुद्धा दोन तक्रारी पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध दिल्याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. या केसेस मागे घे म्‍हणून पतीने तिला लाथाबुक्‍क्यांनी डोक्यावर, हातावर, पाठीवर व कंबरेवर मारहाण केली. घरातील लोखंडी सांडस डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला जोराने मारून जखमी केले. केस मागे घेतली नाही तर जीवे मारून टाकेन अशी धमकी दिल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी पती महेंद्र, सासू सुमन व सासरे सुधाकर धोंडी राऊत यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.