दुसर्‍या टप्प्यात 14 रेती घाटांच्या लिलावांचा मार्ग मोकळा, किमान 10 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता, 67 हजार ब्रास रेती होणार उपलब्ध

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहिल्या टप्प्यातील 12 घाटांचे इ लिलाव पार पडल्यावर आता आणखी 14 रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झालाय! यातून 67 हजार ब्रास रेती उपलब्ध होणार असल्याने बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळतानाच शासनाला किमान 10 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची दाट शक्यता आहे.पहिल्या टप्प्यातील 31 पैकी 12 घाटांचे इ लिलाव 2 …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहिल्या टप्प्यातील 12 घाटांचे इ लिलाव पार पडल्यावर आता आणखी 14 रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झालाय! यातून 67 हजार ब्रास रेती उपलब्ध होणार असल्याने बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळतानाच शासनाला किमान 10 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची दाट शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यातील 31 पैकी 12 घाटांचे इ लिलाव 2 समित्यांनी दिलेल्या पर्यावरणीय अनुमतीनंतर पार पडले होते. 21 जानेवारीला लिलाव पार पडल्यावर निर्धारित किमतीच्या( 4.48 कोटी) तुलनेत 7.97 कोटींचा महसूल मिळाला होता. या लिलावाविरुद्ध औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल याचिका फेटाळण्यात आली. यामुळे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, त्यांचे सहकारी संजय वानखेडे, राजेंद्र एंडोले, प्रशांत रिंढे यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लागले. यामुळे उत्साहित झालेल्या टीम खनिकर्मने लागोलाग दुसर्‍या टप्प्यातील 29 पैकी 14 घाटांच्या इ लिलावाची पूर्वतयारी केली. यामध्ये निमगाव गुरू व देऊळगाव मही भाग 2, नारायणखेड (ता. देऊळगावराजा), भूमराळा सावरगाव तेली, चांगेफल, सावरगाव तेली अ (ता. लोणार), पलसोडा ब, पातोंडा, भोटा, रोटी अ, रोटी ब, येरळी, टाकळी वतपाल, खेडेगाव ब (ता. नांदुरा) आणि बोडगाव, भोनगाव (ता. शेगाव)
असे होणार लिलाव…
या घाटांची माहिती https://buldhana.nic.in/ वर उपलब्ध आहे. इ लिलावासाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणीस प्रारंभ होणार असून, 22 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता बंद होईल. 23 तारखेला सकाळी 10 वाजेपासून इ निविदा ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात होणार असून 4 मार्चला संध्याकाळी 6 वाजता भरणे बंद होईल. 5 मार्चला इ लिलाव झल्यावर संध्याकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयात उघडण्यात आल्यावर जास्त रकमेचा लिलाव मंजूर करण्यात येईल.