दुसऱ्या पत्‍नीकडे धक्‍कादायक मागणी….तिने नकार देताच पहिल्या पत्‍नीसह मिळून विष पाजले!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पहिलीसोबत मिळून नवऱ्याने दुसरीला शिविगाळ करताना माझ्या बापासोबत झोपत जा… असे म्हटला. त्यामुळे संतापलेल्या दुसऱ्या पत्नीने रोगर विष घेतले. तिला तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात आणल्याने जीव वाचला. या प्रकरणात काल, 18 मे रोजी तिने जळगाव जामोद …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्‍यातील मोहिदेपूर येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पहिलीसोबत मिळून नवऱ्याने दुसरीला शिविगाळ करताना माझ्या बापासोबत झोपत जा… असे म्‍हटला. त्‍यामुळे संतापलेल्या दुसऱ्या पत्‍नीने रोगर विष घेतले. तिला तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्‍णालयात आणल्याने जीव वाचला. या प्रकरणात काल, 18 मे रोजी तिने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने पोलिसांनी पहिली पत्‍नी व पतीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ.उज्‍ज्वला मोहन सावंत (28, मोहिदेपूर) यांनी तक्रार दिली की, 6 महिन्‍यांपूर्वी तिचे गावातील मोहन शेषराव सावंत (रा. मोहिदेपूर) याच्‍यासोबत दुसरे लग्न केले आहे. त्याच्‍या सोबत त्याची पहिली पत्नी सौ. उषाही राहते. 18 मे सायंकाळी 5 वाजता पती मोहन सावंत, सवत सौ. उषाबाई, सासरे शेषराव सावंत, सासू कोकिळाबाई घरी असताना, पती व सवत घरातील कामधंद्यावरून शिविगाळ करू लागले. तेव्हा मी म्हटले की मी एकटीच कामधंदा करू का? तेव्हा दोघा नवरा बायकोनी शिविगाळ सुरू केली. पतीने तू माझ्या बापासोबत झोपत जा, असे म्‍हटले. त्‍यावर मी तुमची बायको आहे यापुढे असे बोलाल तर याद ठेवा, असे तिने बजावले. त्‍यामुळे संतापलेल्या पती व सवतीने घरातील विष आणून तिला पाजले. पाजताना सवतीने धरून ठेवले होते, असा आरोप तक्रारीत केला आहे. विष पाजल्यानंतर घराबाहेर येऊन उज्‍ज्‍वला ओरडू लागल्याने गावातील तिची आई सुशिलाबाई रामा शिंदे व भाऊ विनोद शिंदे पळत आले. दोघांनी मोटासायकलवर बसवून जळगाव जामोद ग्रामीण रुग्‍णालयात भरती केले. सवत, पती विष पाजत असताना सासरा, सासूनेही त्‍यांना आवरले नाही, असेही तिने तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी पती व सवतीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. सध्या उज्‍ज्‍वलाची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे.

दीराचीही तक्रार…

सौ.उज्‍ज्वलाच्‍या दीराने या प्रकरणात परस्‍परविरोधी तक्रार केली असून, त्‍यात म्‍हटले आहे, तो आई- वडील, मोठा भाऊ मोहन, त्‍याची पहीली पत्नी उषा सावंत व दुसरी पत्नी उज्वला सावंत यांच्‍यासह राहतो. मोहनची दुसरी पत्‍नी वरच्‍या घरात वेगळी राहते. 18 मे रोजी सायंकाळी साडेपाचला उज्‍ज्वला हिने भाऊ मोहनशी माझ्या नावावर दोन एकर शेती करून द्या म्हणून वाद घातला. नावावर शेती केली नाही तर मी रोगर घेऊन तुमच्या नावाचा पोलीस स्टेशनला रिपोर्ट देईन, अशी धमकी दिली. भाऊ तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने फोन करून गावातील तिचे भाऊ सुनिल रामा शिंदे, विनोद रामा शिंदे, चुलत भाऊ सुभाष प्रल्हाद शिंदे यांना बोलावून घेतले. तेव्हा सुनिल शिंदे हातात कुऱ्हाड घेऊन आला. विनोद शिंदे चाकू घेऊन आला. सुभाष शिंदे काठी घेऊन आला. तिघांनी आम्हाला शिविगाळ केली. सुनिलने माझ्या बहिणीला रोगर का पाजले असे म्हणून मोहनवर कुऱ्हाडीचे वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. विनोदनेही मोहनला चाकू मारला. सुभाषने त्‍याला काठीने मारहाण केली. मोहनची पहिली पत्‍नी उषा त्‍यांना अडविण्यास आली असता तिला सुध्दा त्या तिघांनी चापटा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. उज्‍ज्वलाने तिला मारहाण केली. सर्वांनी घराची तोडफोड केली. दुचाकीची तोडफोड केली. शिवनाथ शिंदे, बाबुराव शिंदे, राजेश सोळंके यांनी मोहनला वाचवले. सध्या त्‍याची प्रकृती गंभीर आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सुनिल रामा शिंदे, विनोद रामा शिंदे, चुलत भाऊ सुभाष प्रल्हाद शिंदे व उज्‍ज्‍वलाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.