देऊळगावजवळ रोडरॉबरीचा थरार!; शेंडीवाल्यासह पाच जणांनी पाठलाग करत दोन दुचाकी मागेपुढे आडव्या लावून एकाला लुटले!; सशस्‍त्र हल्ल्यात दोघे जखमी, लोक मदतीला धावल्याने “कापश्या पळ लवकर, लोक येताहेत’ म्‍हणून काढला पळ…

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिखलखाँ गावाजवळ रोडरॉबरीचा थरार १८ सप्टेंबरच्या रात्री घडला. पाच जणांनी आधी दोन मोटारसायकलींवर शेतकऱ्याला पाठलाग केला. नंतर एक दुचाकी पुढे व एक मागे लावून त्याला अडवले. त्याला मारहाण करत लुटले. हे पाहून मागून येणाऱ्या शेतकऱ्याच्या वडील व मामांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी …
 
देऊळगावजवळ रोडरॉबरीचा थरार!; शेंडीवाल्यासह पाच जणांनी पाठलाग करत दोन दुचाकी मागेपुढे आडव्या लावून एकाला लुटले!; सशस्‍त्र हल्ल्यात दोघे जखमी, लोक मदतीला धावल्याने “कापश्या पळ लवकर, लोक येताहेत’ म्‍हणून काढला पळ…

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्‍यातील पिंपळगाव चिखलखाँ गावाजवळ रोडरॉबरीचा थरार १८ सप्‍टेंबरच्‍या रात्री घडला. पाच जणांनी आधी दोन मोटारसायकलींवर शेतकऱ्याला पाठलाग केला. नंतर एक दुचाकी पुढे व एक मागे लावून त्‍याला अडवले. त्‍याला मारहाण करत लुटले. हे पाहून मागून येणाऱ्या शेतकऱ्याच्‍या वडील व मामांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्‍न केला. पण त्‍यांनी त्‍यांच्‍यावरही सशस्‍त्र हल्ला चढला. हल्ल्यात शेतकऱ्यासह त्‍याचे वडील जखमी झाले आहेत. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी पाच चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.

किशोर अंबादास खरात (२४, रा. नांदखेडा ता. जाफराबाद, जि. जालना) या शेतकऱ्याने काल, १९ सप्‍टेंबरला पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. खरात यांच्‍याकडे ६ एकर शेती आहे. शेतात ते भाजीपाला व इत्तर पिके घेतात. देऊळगाव राजा येथे शनिवारचा बाजार असल्याने शेतातील भाजीपाला मोटारसायकलीवर घेऊन विक्रीसाठी ते आले होते. उरलेला भाजीपाला घेऊन परत निघाले. रात्री साडेआठला देउळगाव राजा येथून नांदखेडा गावाकडे निघाले असता संजयनगरचा बायपास आेलांडत असताना दोन मोटारसायकली त्‍यांच्‍या सोबतच राहू लागल्या. एका मोटारसायकलवर तिघे तर दुसरीवर दोघे बसलेले होते. पिंपळगाव चिलमखाँ थांब्याजवळ एका मोटारसायकलवरील तिघांनी त्यांची मोटारसायकल समोरून आडवी लावली. मागच्या दोघांनी त्यांची मोटारसायकल मागून लावली. त्‍यामुळे खरात यांनी मोटारसायकल थांबवली. मोटारसायकल थांबवताच तिघांनी त्‍यांना लोटून दिले. ते प्रवाशी थांबण्याच्‍या लोखंडी बाकड्यावर पडले.

पाचही चोरट्यांनी मारहाण करत त्‍यांच्‍या खिशातील मोबाइल (किंमत अंदाजे ३ हजार रुपये) काढून घेतला. उजव्या खिशातील ८ हजार रुपये काढून घेतले. हा सर्व प्रकार घडत असतान मागून खरात यांचे वडील अंबादास भगवान खरात व मामा राहुल ज्ञानदेव गरुड आले. मामाने मोबाइलचा लाइट लावला असता दोघांचे चेहरे दिसले. पैकी एकाच्‍या डोक्याला शेंडी होती. दुसऱ्याच्‍या अंगात काळे जॅकेट होते. मामा व वडील धावून आल्यानंतर चोरट्यांनी पळून जाण्याऐवजी त्‍यांच्‍यावरही हल्ला चढवला. खरात यांच्‍या डोळ्यावर कुठल्‍या तरी हत्‍याराने वार केला. त्‍यांच्‍या वडिलांच्या पाठीत विळा मारला. मामाच्या डाच्‍या हातावर व डोक्यात काहीतरी रुमालात गुंडाळलेल्या वस्तूने मारले. या आरडाओरड्यामुळे आजूबाजूचे लोक धावून आले. तेव्‍हा कापश्या चला लवकर निघा येथून, लोक इकडे येत आहेत… असे म्‍हणत पाचही जण दोन्‍ही मोटारसायकलींवरून पसार झाले. मोटारसायकल पल्सर कंपनीची लाल होती व तिचा क्रमांक 8338 होता. पोलिसांनी पाचही चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, तपास देऊळगाव राजा पोलीस करत आहेत.