देऊळगाव महीत विकत होता गोमांस!; पोलिसांनी पकडले

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोमांस विक्री करणाऱ्यावर देऊळगाव मही पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी आज, 21 एप्रिलला सकाळी 10 वाजता कारवाई केली. देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील गारखेड रोडवर शेख इरफान शेख आयुब (६५) हा गोमांस विकत होता. महादेव कुटे यांनी त्याची माहिती देऊळगाव मही पोलिसांना दिली. पोलिसांनी छापा मारून त्याच्याकडील …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गोमांस विक्री करणाऱ्यावर देऊळगाव मही पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी आज, 21 एप्रिलला सकाळी 10 वाजता कारवाई केली.

देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील गारखेड रोडवर शेख इरफान शेख आयुब (६५) हा गोमांस विकत होता. महादेव कुटे यांनी त्‍याची माहिती देऊळगाव मही पोलिसांना दिली. पोलिसांनी छापा मारून त्‍याच्‍याकडील ६५ किलो मांस (किंमत ६५००), दोन सुरे (किंमत १००), वजन काटा (किंमत १२००) असा एकूण ७८०० रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात शेख इरफानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.