देऊळगाव राजाच्‍या नगराध्यक्षा शिवसेनेच्‍या वाटेवर?

बुलडाणा ( कृष्णा सपकाळ ः लाइव्ह वृत्तसेवा) : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा मतदारसंघ असलेल्या सिंदखेड राजा विधानसभेतील देऊळगाव राजा शहरात लवकरच राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सत्तापरिवर्तनामुळे जिकडे सत्ता तिकडे ओढा याप्रमाणे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगराध्यक्षा सुनिताताई शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नगराध्यक्षांसोबत भाजपचे दोन नगरसेवकही भाजपला जय श्रीराम …
 

बुलडाणा ( कृष्णा सपकाळ ः लाइव्‍ह वृत्तसेवा) : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा मतदारसंघ असलेल्या सिंदखेड राजा विधानसभेतील देऊळगाव राजा शहरात लवकरच राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सत्तापरिवर्तनामुळे जिकडे सत्ता तिकडे ओढा याप्रमाणे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगराध्यक्षा सुनिताताई शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नगराध्यक्षांसोबत भाजपचे दोन नगरसेवकही भाजपला जय श्रीराम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे देऊळगाव राजा शहरात केवळ भाजपचा एक सदस्य उरणार आहे.
नगर परिषद निवडणुका झाल्या तेव्हा राज्यात युतीचे सरकार होते. मात्र आता राज्यात आघाडीचे सरकार आल्याने भाजपसोबत असलेली शिवसेना आघाडीसोबत आल्याने आघाडीचे संख्याबळ वाढले. तुम्ही सेनेत प्रवेश करा नाहीतर अविश्वास ठराव दाखल करू, अशा सूचना नगराध्यक्षांना दिल्याचे कळते. त्यामुळे पद टिकवण्यासाठी लवकरच नगराध्यक्ष सेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत लवकरच हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.