देऊळगाव राजातील हॉटेल गौरववर छापा; देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्‍त!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत अवैध धंदे, दारू विक्री व चोरट्या रेती वाहतुकीवर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) वक्रदृष्टी पडल्याने रेतीमाफिया आणि अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. देऊळगाव राजा- जालना बायपासवरील हॉटेल गौरव ढाब्यावर छापा मारून एलसीबीने देशी व विदेशी दारूचा 25,940 रुपयांचा साठा जप्त केला. काल, 12 एप्रिलला ही कारवाई करण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत अवैध धंदे, दारू विक्री व चोरट्या रेती वाहतुकीवर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेची (एलसीबी) वक्रदृष्टी पडल्‍याने रेतीमाफिया आणि अवैध धंदेवाल्‍यांचे धाबे दणाणले आहेत. देऊळगाव राजा- जालना बायपासवरील हॉटेल गौरव ढाब्‍यावर छापा मारून एलसीबीने देशी व विदेशी दारूचा  25,940 रुपयांचा साठा जप्‍त केला. काल, 12 एप्रिलला ही कारवाई करण्यात आली.

मोहसीन खान मंजूर खान (34, रा. वॉर्ड क्र.1, प्रतापनगर देऊळगाव राजा) याला पोलिसांनी ताब्‍यात घेत गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्‍पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्‍या आदेशाने पीएसआय नीलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, साजिद शेख, विलास काकड, श्रीकृष्ण चांदूरकर, नदीम शेख, दीपक वायाळ, चालक शिवानंद मुंढे यांच्‍या पथकाने केली.

खामगावमध्येही कारवाई

एलसीबीने अवैधरित्‍या विदेशी दारू विक्री करणाऱ्या सोनू लक्ष्मणसिंह ठाकूर (34, रा. सतिफैल, खामगाव) याला ताब्‍यात घेत त्‍याच्‍याकडून 3650 रुपयांची दारू जप्‍त केली. ही कारवाई सुदर्शन धांबा, अकोला रोडवर करण्यात आली. त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हे दाखल करून त्‍याला खामगाव ग्रामीण पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले आहे. ही कारवाई कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्‍पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्‍या आदेशाने ही कारवाई सहायक पोलीस निरिक्षक श्री. चतरकर, रघुनाथ जाधव, गजानन अहेर, दीपक पवार, संजय मिसाळ यांच्‍या पथकाने केली.