देऊळगाव राजात माजी नगरसेवकाला दारू विकताना पकडले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूची अवैध विक्री करताना देऊळगाव राजा येथे माजी नगरसेवकाला स्थानिक गुन्हे शाखेने काल, 26 मार्चला ताब्यात घेतले. नाना कासारे असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी संजयनगरमध्ये एका घरावर छापा मारला. तिथे कासारेला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या बाटल्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दारूची अवैध विक्री करताना देऊळगाव राजा येथे माजी नगरसेवकाला स्‍थानिक गुन्‍हे शाखेने काल, 26 मार्चला ताब्‍यात घेतले. नाना कासारे असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. रात्री उशिरा त्‍याच्‍याविरुद्ध पोलीस ठाण्यात त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी संजयनगरमध्ये एका घरावर छापा मारला. तिथे कासारेला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या बाटल्या व रोख 8090 रुपये असा एकूण 38210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.