देऊळगाव राजात शिवजयंतीचा उत्‍साह..!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्थानक चौकासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध राजकीय, सामाजिक संघटना, पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देऊळगाव राजा शहरासह तालुक्यात साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध आभिषेक करण्यात आला. माजी आमदार डॉ. शशिकांत …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्‍हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बसस्थानक चौकासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध राजकीय, सामाजिक संघटना, पक्षांच्‍या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्‍हणून देऊळगाव राजा शहरासह तालुक्यात साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

सकाळी दहा वाजता  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध आभिषेक करण्यात आला. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शहरातील प्रथम नागरिक सौ. सुनिताताई शिंदे,  शिवसेना नेते डाॅ. रामप्रसाद शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजीव सिरसाट, भाजपा युवा नेते डॉ. सुनिल कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गणेशराव बुरुकूल, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ कायंदे, भाजपा तालुका अध्यक्ष विठोबा मुंढे, जिल्हा उपप्रमुख दीपकभाऊ बोरकर, शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांच्‍यासह अनेक शिवभक्तांनी शिवरायांच्‍या पुतळ्याला अभिवादन केले. संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिव जयंती साजरी करण्यात आली.