देऊळगाव राजा ः मनोज कायंदे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील जवळखेड, आळंद, उंबरखेड ,गोंधनखेड, आसोला, पिपळगाव, चिंचोली बुरकूल, बामखेड या भागांतील नुकसानीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ कायंदे यांनी 20 फेब्रुवारीला केली. गहू, हरभरा ही पिके काढणीला आली होती. मात्र अवकाळी …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील  जवळखेड, आळंद, उंबरखेड ,गोंधनखेड, आसोला, पिपळगाव, चिंचोली बुरकूल, बामखेड या भागांतील नुकसानीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ कायंदे यांनी 20 फेब्रुवारीला केली.

गहू, हरभरा ही पिके काढणीला आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे ते हिरावले. कर्ज काढून कांदा, मिरची, मका, टरबुज, खरबुज या सिड्स कंपनीच्या बियाण्याची  लागवड शेतकऱ्यांनी केली होती. तेही नष्ट झाल्‍याने शेतकरी नुकसानीत सापडला झाला. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करावे, अशी मागणी जिल्‍हा परिषद सदस्‍य तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ कायंदे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच गजानन काकड, मंडळ आधिकारी श्री. वाघ, तलाठी श्रीमती चिकटे, तालुका कृषी सहाय्यक श्री. डोईफोडे, श्री. मेहत्रे, श्री. ढाकणे तसेच प्रत्येक गावातील ग्रामसेवक, शेतकरी बांधव उपस्थित होते.