देऊळगाव राजा ः 27 फेब्रुवारीपूर्वी कापूस बाजार समितीत आणा, अन्यथा….

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कधीही लॉकडाऊनची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी २७ फेब्रुवारीपूर्वी कापूस विक्रीसाठी बाजार समितीत आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे. देऊळगाव राजा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजून बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे. भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्‍हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे राज्‍यात कधीही लॉकडाऊनची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांनी २७ फेब्रुवारीपूर्वी कापूस विक्रीसाठी बाजार समितीत आणावा, असे आवाहन कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीने केले आहे.

देऊळगाव राजा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजून बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे. भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला नाही. कापूस बाजार समितीत विक्रीसाठी आणावा अन्‍यथा २७ फेब्रुवारीपासून जाहीर लिलावाने होणारी हर्राशी बंद होणार आहे, अशी माहिती सूचना फलकावर देण्यात आली आहे.