देऊळगाव राजा ः 422 उमेदवारांचे भाग्य उद्या होणार मतपेटीत बंद!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचे निवडणूक साहित्य आज, 14 जानेवारीला त्या त्या मतदान केंद्रांवर नेण्यात आले. उद्या 15 जानेवारीला 137 जागांवर उभ्या असलेल्या 422 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद होणार आहे. देऊळगाव राजा शहरातील स्थानिक नगरपालिका टॉऊन हॉल येथे निवडणूक साहित्य कर्मचार्यांना वाटप करण्यात आले. एसटी बस, क्रूझर वाहनांद्वारे …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचे निवडणूक साहित्य आज, 14 जानेवारीला त्या त्या मतदान केंद्रांवर नेण्यात आले. उद्या 15 जानेवारीला 137 जागांवर उभ्या असलेल्या 422 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद होणार आहे.

देऊळगाव राजा शहरातील स्थानिक नगरपालिका टॉऊन हॉल येथे निवडणूक साहित्य कर्मचार्‍यांना वाटप करण्यात आले. एसटी बस, क्रूझर वाहनांद्वारे त्यांना नियुक्त केलेल्या गावांत पाठविण्यात आले. यासाठी सकाळपासून शिक्षक, तहसील कर्मचारी, पोलीस कर्मचारी हजर झले होते. ग्रामपंचायत निवडणूक अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे जादा पोलीस बंदोबस्त प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आहे. या वेळी तहसीलदार तथा निवडणूक निर्णयक अधिकारी सारिका भगत, नायब तहसीलदार प्रिती जाधव, नायब तहसीलदार श्री. कुलपते आदींची उपस्थिती होती. काल रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे उमेदवारांच्या कॉर्नर बैठका आज सायंकाळपर्यंत सुरू होत्या. अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवक उमेदवार मोठ्या प्रमाणावर उभे असल्याचे दिसून येत आहे. एक प्रकारे ज्येष्ठांना आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. तसेच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत देऊळगाव मही या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.