देऊळगाव राजा तालुक्‍यात मोटारपंप चोरीचे सत्र सुरूच… चौथा पंप गेला चोरीला!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यात मोटारपंप चोरीचे सत्र सुरूच आहे. चालू आठवड्यात शहर व तालुक्यातील तीन मोटारपंप चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चौथी घटना आज, १६ जुलैला दुपारी समोर आली.देऊळगाव राजा शहरातील शिंगणेनगर परिसरातील डिगांबर संतोष ठुमके (७०) यांच्या शेतातील विहिरीत सौरऊर्जेचा पंप (अंदाजे किंमत १७ हजार रुपये) …
 
देऊळगाव राजा तालुक्‍यात मोटारपंप चोरीचे सत्र सुरूच… चौथा पंप गेला चोरीला!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्‍यात मोटारपंप चोरीचे सत्र सुरूच आहे. चालू आठवड्यात शहर व तालुक्यातील तीन मोटारपंप चोरीला गेल्याच्‍या घटना घडल्‍या आहेत. चौथी घटना आज, १६ जुलैला दुपारी समोर आली.
देऊळगाव राजा शहरातील शिंगणेनगर परिसरातील डिगांबर संतोष ठुमके (७०) यांच्या शेतातील विहिरीत सौरऊर्जेचा पंप (अंदाजे किंमत १७ हजार रुपये) चोरीस गेला. डिगांबर ठुमके आज दुपारी तीनच्या सुमारास शहराजवळील शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता विहिरीत फक्त पाईप लटकलेला दिसला. मोटार गायब होती. त्यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ प्रदीप गुंजकर करत आहेत.