देऊळगाव राजा तालुक्‍यात दुबार पेरणीचे संकट टळले

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःदहा-पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतित झाला होता. मोलामहागाचे बियाणे शेतात पेरून व लागवड करून पाऊस येण्याची वाट पाहत होता. दुबार पेरणी करावी लागते की काय या चिंतेत शेतकरी होता. तालुक्यात उन्हामुळे पिके सुकू लागली होती. मात्र काल, ६ जुलैला संध्याकाळी दमदार पाऊस झाला. त्यामुळे बळीराजावरचे …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःदहा-पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतित झाला होता. मोलामहागाचे बियाणे शेतात पेरून व लागवड करून पाऊस येण्याची वाट पाहत होता. दुबार पेरणी करावी लागते की काय या चिंतेत शेतकरी होता. तालुक्यात उन्हामुळे पिके सुकू लागली होती. मात्र काल, ६ जुलैला संध्याकाळी दमदार पाऊस झाला. त्‍यामुळे बळीराजावरचे दुबार पेरणीचे संकट टळले. तालुक्यातील शेतकरी आनंदी झाला आहे.