देऊळगाव राजा नगर परिषदेच्‍या मुख्याधिकारीपदी अरुण मोकळ रूजू; पहिल्याच दिवशी घातला महत्त्वाच्‍या विषयाला हात!

देऊळगाव राजा बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून अरुण मोकळ नुकतेच रूजू झाले आहेत. छोटेखानी समारंभात कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य प्रयत्न करणार असल्याचे नव्या “सीओं’नी सांगितले. मूळचे मालेगावचे असलेले श्री. मोकळ यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी होते. निवेदिता घार्गे यांची बदली पुण्याला झाल्याने श्री. मोकळ …
 
देऊळगाव राजा नगर परिषदेच्‍या मुख्याधिकारीपदी अरुण मोकळ रूजू; पहिल्याच दिवशी घातला महत्त्वाच्‍या विषयाला हात!

देऊळगाव राजा बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी म्‍हणून अरुण मोकळ नुकतेच रूजू झाले आहेत. छोटेखानी समारंभात कर्मचाऱ्यांनी त्‍यांचे स्वागत केले. नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य प्रयत्‍न करणार असल्याचे नव्या “सीओं’नी सांगितले.

मूळचे मालेगावचे असलेले श्री. मोकळ यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी होते. निवेदिता घार्गे यांची बदली पुण्याला झाल्याने श्री. मोकळ त्‍यांच्‍या जागेवर रूजू झाले. त्‍यांच्‍याकडे संगणक अभियांत्रिकीची पदवी असून, एमबीएसुद्धा झालेले आहेत. २०१७ मध्ये एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईत तीन वर्षे त्‍यांनी कर निरिक्षक म्‍हणून काम केले. दीड वर्षांपूर्वी राळेगावला ते रूजू झाले होते.