देऊळगाव राजा पं. स. उपसभापतीपदी सौ. कल्याणी शिंगणे बिनविरोध

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सौ. रेणुकाताई गणेश बुरुकुल यांनी राजीनामा दिल्यामुळे देऊळगाव राजा पंचायत समितीचे सभापतीपद रिक्त झाले होते. २६ जुलैला सभापतिपदी हरिभाऊ शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र उपसभापतीपदही रिक्त होते. त्यावर आज, ९ ऑगस्टला सौ. कल्याणी गजेंद्र शिंगणे बिनविरोध विराजमान झाल्या. एकूण सहा सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीत …
 
देऊळगाव राजा पं. स. उपसभापतीपदी सौ. कल्याणी शिंगणे बिनविरोध

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सौ. रेणुकाताई गणेश बुरुकुल यांनी राजीनामा दिल्यामुळे देऊळगाव राजा पंचायत समितीचे सभापतीपद रिक्‍त झाले होते. २६ जुलैला सभापतिपदी हरिभाऊ शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र उपसभापतीपदही रिक्त होते. त्‍यावर आज, ९ ऑगस्‍टला सौ. कल्याणी गजेंद्र शिंगणे बिनविरोध विराजमान झाल्या.

एकूण सहा सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीत राष्ट्रवादीच्‍या चार सदस्या आहेत. यातून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्‍या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण यांनी सौ. कल्याणी शिंगणे यांचे नाव जाहीर केले. एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्‍या बिनविरोध निवडून आल्या. निवडणूक निर्णयक अधिकारी म्हणून तहसीलदार सारिका भगत यांनी काम पाहिले. यावेळी तालुकाध्यक्ष राजीव सिरसाट, सभापती हरिभाऊ शेटे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, माजी सभापती सौ. रेणुकाताई बुरुकुल, महिला आघाडी तालुकाध्यक्षा मंदाताई शिंगणे, गजानन पवार, एल. एम. शिंगणे, गणेश बुरुकुल, गजेंद्र शिगणे अादी उपस्थित होते.