देऊळगाव राजा बॅरिकेट्‌सने बंदिस्त!; अतिअत्यावश्यक सेवेव्‍यतिरिक्‍त ना कुणी बाहेर ना कुणी आत..!; शहरातील मुख्य रस्‍तेही बंद!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन असला तरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाने शहराच्या चोहोबाजूंनी बॅरिकेट्स लावले आहेत. शहरातून जाणारे मुख्य रस्ते बंद केल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. देऊळगाव राजा शहरातून जाणारा जालना ते चिखली, जालना ते टेंभुर्णी, जाफराबाद, भोकरदन या रस्त्यावर अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही आत …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन असला तरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्‍ण वाढतच आहेत. त्‍यामुळे तालुका प्रशासनाने शहराच्या चोहोबाजूंनी बॅरिकेट्‌स लावले आहेत. शहरातून जाणारे मुख्य रस्ते बंद केल्‍याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

देऊळगाव राजा शहरातून जाणारा जालना ते चिखली, जालना ते टेंभुर्णी, जाफराबाद, भोकरदन या रस्त्यावर अत्‍यावश्यक सेवा वगळता कोणालाही आत किंवा बाहेर प्रवेश दिला जात नाही. बस स्थानक चौक, जुना जालना रोड, बालाजी गल्ली, कमिटी चौक, जाफराबाद वेस आदी ठिकाणी बॅरिकेट्‌स लावण्यात आले आहेत.