देऊळगाव राजा, संग्रामपूर तालुक्‍यातही बर्ड फ्लूची ठकठक!; मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली, मोताळा, शेगाव तालुक्यानंतर आता देऊळगाव राजा, संग्रामपूर तालुक्यावरही बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. संग्रामपूरच्या पालसोडा, देऊळगाव राजाच्या देऊळगाव मही आणि शेगावच्या चारमोरी येथे पक्षी मृत आढळल्याने त्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.यापूर्वी चिखली तालुक्यातील भानखेड आणि मोताळा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली, मोताळा, शेगाव तालुक्‍यानंतर आता देऊळगाव राजा, संग्रामपूर तालुक्‍यावरही बर्ड फ्‍लूचे संकट घोंगावत आहे. संग्रामपूरच्‍या पालसोडा, देऊळगाव राजाच्‍या देऊळगाव मही आणि शेगावच्‍या चारमोरी येथे पक्षी मृत आढळल्‍याने त्‍यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्‍यांचा अहवाल काय येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी चिखली तालुक्‍यातील भानखेड आणि मोताळा तालुक्‍यातील सारोळापीर येथील पक्ष्यांना बर्ड फ्‍लूची लागण झाल्‍याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. शेगाव येथील भोलपुऱ्यातही बर्ड फ्‍लूने एंटी करून धसका वाढवला होता. पशूसंवर्धन विभागाने या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेत तेथील पक्ष्यांना दयामरण दिले होते. बाधित क्षेत्राच्‍या १ किलोमीटर परिसरात खबरदारीचे उपाय योजण्यात आले होते. ज्‍या पक्षांना दयामरण दिले त्‍या पक्षांच्‍या मालकांना मदतही करण्यात आली. मात्र ही मदत तोकडी असल्याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे. जिल्ह्यात ४१४ लहान मोठे पोल्‍ट्री फार्म असून, त्‍यावर सध्या पशुसंवर्धन विभागाची करडी नजर आहे. पशुधन विकास अधिकारी नियमित या पोल्‍ट्री फार्मना भेट देऊन पाहणी करत वरिष्ठांना अहवाल पाठवत आहेत.