देऊळगाव साकर्शा शिवारात आढळला गळफास घेतलेला मृतदेह!

जानेफळ (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, 3 जून रोजी देऊळगाव साकर्शा (ता. मेहकर) शिवारातील उतावळी प्रकल्पाच्या डोंगरकडेला पळसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या व्यक्तीचे अंदाजे वय 64 वर्षीय असून, ओळख पटण्यालायक कोणतीही वस्तू मृतदेहाजवळ जानेफळ पोलिसांना आढळली नाही. पांढरा रूमाल, पांढरा शर्ट, काळी टोपी, जवळ गोळ्याचे पाकिट, पांढरे केस, शरीरबांधा …
 

जानेफळ (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आज, 3 जून रोजी देऊळगाव साकर्शा (ता. मेहकर) शिवारातील उतावळी प्रकल्पाच्‍या डोंगरकडेला पळसाच्‍या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्‍थेत मृतदेह आढळला. या व्‍यक्‍तीचे अंदाजे वय 64 वर्षीय असून, ओळख पटण्यालायक कोणतीही वस्‍तू मृतदेहाजवळ जानेफळ पोलिसांना आढळली नाही.

पांढरा रूमाल, पांढरा शर्ट, काळी टोपी, जवळ गोळ्याचे पाकिट, पांढरे केस, शरीरबांधा मध्यम असे त्‍याचे वर्णन आहे. वर्णनावरून हा व्‍यक्‍ती मुस्लिम समाजाचा असावा, असे सूत्रांनी सांगितले. घटनास्‍थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकरच्‍या ग्रामीण रुग्‍णालयात पाठविण्यात आला. तपास पोलीस उपनिरिक्षक अशोक काकडे (मो. 8805999178) करत आहेत.