देऊळघाटच्या मुलीला पळवून नेणाऱ्या धाडच्या तरुणाला पकडले!; मुलीची सुटका करून आई-वडिलांकडे सोपवले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळघाट (ता. बुलडाणा) येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण ९ ऑक्टोबरला झाले होते. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून धाड येथील शेख चांद शेख कादीर (१९, रा. धाड, ता. बुलडाणा) या तरुणाविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याला काल, १६ ऑक्टोबर रोजी धाड येथून अटक करण्यात आली व अल्पवयीन मुलीची सुटका करून …
 
देऊळघाटच्या मुलीला पळवून नेणाऱ्या धाडच्या तरुणाला पकडले!; मुलीची सुटका करून आई-वडिलांकडे सोपवले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळघाट (ता. बुलडाणा) येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण ९ ऑक्टोबरला झाले होते. तिच्या वडिलांच्‍या तक्रारीवरून धाड येथील शेख चांद शेख कादीर (१९, रा. धाड, ता. बुलडाणा) या तरुणाविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला होता. त्‍याला काल, १६ ऑक्टोबर रोजी धाड येथून अटक करण्यात आली व अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला तिच्या आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तरुणाला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

९ ऑक्टोबरच्या रात्री ते देऊळघाट येथील अल्पवयीन मुलगी परिवारासह झोपली होती. त्यावेळी वडिलांचा मोबाइल मुलीजवळ होता. रात्री ११ ला मुलीच्या आईला जाग आली असता मुलगी दिसली नव्हती. सर्वत्र शोधाशोध करूनही ती सापडली नाही. मुलगी झोपली होती तिथे तिच्या वडिलांचा फोन तिने ठेवला होता.

फोन तपासला असता त्यात १०.५५ वाजता एका मोबाइल नंबरवरून कॉल करण्यात आला होता. त्यावर फोन लावून बघितला असता समोरून कुणी बोलले नव्हते. त्यानंतर मोबाइल स्वीच ऑफ झाला. त्यानंतर “त्या’ मोबाइल नंबरचा शोध घेतला असता तो नंबर धाड येथील शेख चांद शेख कादीर याचा असल्याचे समोर आले होते. दुसऱ्या दिवशी मुलीचे आई- वडील धाड येथे तरुणाच्या घरी गेले असता तरुणाच्या वडिलांनी ,”तुमची मुलगी आणि माझा मुलगा रात्री घरी आले होते. मी त्यांना घरात न घेता हाकलून लावले’ असे सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या आई- वडिलांनी थेट पोलीस बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून अपहरणाची तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी शेख चांद विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.