देऊळघाटनंतर करवंड!; पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालक जखमी

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चार बालकांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच चिखली तालुक्यातील करवंड येथेही तशीच घटना घडली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावर खेळणार्या 4 बालकांवर हल्ला करून जखमी केले. ही घटना आज, 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. जखमी बालकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चार बालकांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच चिखली तालुक्यातील करवंड येथेही तशीच घटना घडली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावर खेळणार्‍या 4 बालकांवर हल्ला करून जखमी केले. ही घटना आज, 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. जखमी बालकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निशा सागर गवई (5 ), शेख असद शेख अन्वर (9), पूर्वा सुनील फाटे (11) व कार्तिक समाधान तारगे (6 ) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याची नावे आहेत. घटनेनंतर गावातील नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला मारून टाकले आहे.