देऊळघाटमध्ये आढळला कोरोना रुग्‍ण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 23 ऑगस्टला कोरोनाचा एक नवा पॉझिटिव्ह रुग्ण समोर आला असून, देऊळघाट (ता. बुलडाणा) येथील हा रुग्ण आहे. तीन रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आले आहे. सध्या रुग्णालयांत 27 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 664 अहवाल प्राप्त झाले आहेत. …
 
देऊळघाटमध्ये आढळला कोरोना रुग्‍ण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 23 ऑगस्‍टला कोरोनाचा एक नवा पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आला असून, देऊळघाट (ता. बुलडाणा) येथील हा रुग्‍ण आहे. तीन रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आले आहे. सध्या रुग्‍णालयांत 27 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 663 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 448 तर रॅपिड टेस्टमधील 215 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 677910 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86673 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1150 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87372 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 27 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.