देऊळघाटमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा 4 चिमुकल्यांवर हल्ला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 4 लहान मुले जखमी झाली. ही घटना देऊळघाट (ता. बुलडाणा) येथे काल, 8 फेब्रुवारीला घडली. मोहम्मद फैजान मोहम्मद जकीर अन्सारी (6), कासीम खान आसिफ खान (4), माविया खान मुंतजीर खान (7) आणि गजानन स्वप्नील देशमुख (10) अशी जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 4 लहान मुले जखमी झाली. ही घटना देऊळघाट (ता. बुलडाणा) येथे काल, 8 फेब्रुवारीला घडली. मोहम्मद फैजान मोहम्मद जकीर अन्सारी (6), कासीम खान आसिफ खान (4), माविया खान मुंतजीर खान (7) आणि गजानन स्वप्नील देशमुख (10) अशी जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देऊळघाटमध्ये एक पिसाळलेल्या कुत्रा हैदोस घालत असून, गावात फिरून एकट्या लहान मुलांवर हल्ला चढवत आहे. त्यांना चावे घेत सैरावैरा पळत आहे. पिसाळलेला कुत्रा एका ठिकाणी थांबत नसल्याने त्याचा शोध लावणे ग्रामस्थांना कठीण जात आहे.