देऊळघाट ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप फोडले, दरवाजाही तोडला; विरोध करणाऱ्यांना हातातील दगड दाखवून पिटाळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून दरवाजाचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी आज, 22 मार्चच्या सकाळी ग्रामपंचायत सचिव पी. एस. देशमुख यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. देशमुख यांना काल, 21 मार्चच्या रात्री ग्रामपंचायत कर्मचारी नागो जाधव यांनी कुणीतरी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून दरवाजाचे नुकसान केल्याचे कळवले होते. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्‍यातील देऊळघाट ग्रामपंचायतीच्‍या कार्यालयाचे कुलूप तोडून दरवाजाचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी आज, 22 मार्चच्‍या सकाळी ग्रामपंचायत सचिव पी. एस. देशमुख यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

देशमुख यांना काल, 21 मार्चच्या रात्री ग्रामपंचायत कर्मचारी नागो जाधव यांनी कुणीतरी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून दरवाजाचे नुकसान केल्याचे  कळवले  होते. आज सकाळी त्यांनी कार्यालयात जाऊन पाहिले असता त्यांना कुलूप तोडल्याचे व दरवाजाचे नुकसान झाल्याचे दिसले. देऊळघाट येथील शेख नासिर शेख शब्बीर मुल्लाजी व इरफान खान बब्बू खान यांनी सचिवांना माहिती दिली की काल रात्री भारत ऊर्फ राजू भिका शिंदे (रा. देऊळघाट) याने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडले व लाथा मारून दरवाजाचे नुकसान केले. त्यावेळी दोघांनीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने हातातील दगड दाखवत हिसका मारून पळून गेला. याप्रकरणी देशमुख यांनी राजू शिंदे याच्याविरोधात बुलडाणा ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे.