देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले

काँग्रेसचा आरोप; सत्ता गेल्याने सैरभैर झाल्याची टीकामुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार व महाविकास आघाडीवर टीकेची राळ उठविली आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी आता त्यावर प्रतिहल्ला करत फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला आहे. सत्ता गेल्यानंतर फडणवीस सैरभैर झाले असून ते काहीही …
 

काँग्रेसचा आरोप; सत्ता गेल्याने सैरभैर झाल्याची टीका
मुंबई
: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार व महाविकास आघाडीवर टीकेची राळ उठविली आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी आता त्यावर प्रतिहल्ला करत फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला आहे. सत्ता गेल्यानंतर फडणवीस सैरभैर झाले असून ते काहीही बरळत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात २२ मंत्र्यांवर आरोप झाले होते. त्यांच्यापैकी किती जणांचे फडणवीस यांनी राजीनामे घेतले? एकाही नाही. भाजपच्या सगळ्या मंत्र्यांचे फडणवीस हेच न्यायाधीश झाले होते. भाजपने २०१४ पासून एकनाथ खडसे सोडून कुण्याही मंत्र्याची चौकशी लावली नाही. एवढेच नव्हे तर अमित शहांच्या काळात पुलावामा हल्ला झाला. म्हणून त्यांनी राजीनामा दिला का? अशी प्रश्नांची सरबत्ती काँग्रेस प्रवक्त्यांनी केली आहे.परमबीरसिंग यांचा लेटरबॉम्ब फुसका आहे,असा दावाही राजू वाघमारे यांनी केला आहे.