देव तारी त्याला… आमदार डॉ. रायमूलकर थोडक्यात बचावले!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, 10 फेब्रुवारीला आमदार डॉ. संजय रायमूलकर दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. चंदपूर जिल्ह्यातील आक्सापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी करत असताना ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. यात जिवावरचे बोटावर निभावले आहे. यापूर्वी कार अपघातातून डॉ. रायमूलकर बचावले होते, तर त्यांच्या मुलाचाही अपघात होऊन जखमी झाला होता. त्यातच हा अपघात झाल्याने चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, 10 फेब्रुवारीला आमदार डॉ. संजय रायमूलकर दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. चंदपूर जिल्ह्यातील आक्सापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी करत असताना ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. यात जिवावरचे बोटावर निभावले आहे. यापूर्वी कार अपघातातून डॉ. रायमूलकर बचावले होते, तर त्यांच्या मुलाचाही अपघात होऊन जखमी झाला होता. त्यातच हा अपघात झाल्याने चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता.
सूत्रांनी सांगितले, की आमदार डॉ. रायमूलकर पंचायत राज समितीचे अध्यक्ष असल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. दौर्‍यात आज आक्सापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ते पाहणी करत होते. तिथे ऑक्सिजन सिलिंडर कार्यरत नसल्याच्या तक्रारीचा आढावा घेत असताना डॉ. रायमूलकर यांनी स्वतःच सिलिंडरचा कॉक फिरवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ताकदीने फिरवलेला सिलिंडरच्या नॉबचा एकदम स्फोट झाला. वेळीच डॉ. रायमूलकर बाजूला झाले म्हणून ठीक अन्यथा जिवावरही बेतू शकले असते. यासंदर्भात बुलडाणा लाइव्हने डॉ. रायमूलकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, की मी सुखरुप आहे. थोडेसे लागले आहे. पण त्यामुळे दौर्‍यात काही व्यत्यय आला नाही. या घटनेनंतर मी बैठकही घेतली आहे. उद्या दौर्‍यात राहून परवा बुलडाणा जिल्ह्यात परतेल.