देशात महिलांवरील अत्याचार वाढले; पश्चिम बंगाल, ओडिशा अत्‍याचारांत टॉपवर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असले तर देशातील इतर राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मात्र लक्षणीय घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) ही माहिती दिली आहे. १५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये …
 
देशात महिलांवरील अत्याचार वाढले; पश्चिम बंगाल, ओडिशा अत्‍याचारांत टॉपवर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असले तर देशातील इतर राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मात्र लक्षणीय घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) ही माहिती दिली आहे.

१५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये ८.३ टक्के इतकी लक्षणीय घट झाली आहे. २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी केलेला छळ, सासरच्यांनी केलेला छळ असे देशभरात ४ लाख ५ हजार ३२६ गुन्हे दाखल झाले होते तर २०२० मध्ये ३ लाख ७१हजार ५०३ गुन्हे दाखल झाले.

सायबर गुन्हे वाढले…
वाढत्या टेक्नोलॉजीसोबत सायबर गुन्ह्यांमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे “एनसीआरबी’च्या अहवालावरून समोर आले आहे. २०२० मध्ये देशभरात ५००३५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण ११.८ टक्क्यांनी वाढल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.