दोघांचेही दुसरे लग्‍न असूनही “त्‍याने’ तिच्‍यासोबत नको ते केले…!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेचा सासरच्या मंडळीने पैशासाठी छळ मांडला. तीन लाख रुपये आणल्याशिवाय घरात येऊ नको, असे म्हणत मारहाण करून तिला घराबाहेर हाकलले. याप्रकरणाची तक्रार विवाहितेने काल, ८ सप्टेंबर रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून तिच्या पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रिसोड तालुक्यातील पाचंबा येथील रुख्मिणीचा विवाह डोंगरगाव …
 
दोघांचेही दुसरे लग्‍न असूनही “त्‍याने’ तिच्‍यासोबत नको ते केले…!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेचा सासरच्या मंडळीने पैशासाठी छळ मांडला. तीन लाख रुपये आणल्याशिवाय घरात येऊ नको, असे म्हणत मारहाण करून तिला घराबाहेर हाकलले. याप्रकरणाची तक्रार विवाहितेने काल, ८ सप्टेंबर रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून तिच्या पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रिसोड तालुक्यातील पाचंबा येथील रुख्मिणीचा विवाह डोंगरगाव (ता. चिखली) येथील पांडुरंग बळीराम दादडे याच्याशी ऑगस्ट २०२० मध्ये लग्न झाला होता. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. पांडुरंग याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्याने रुख्मिणीसोबत दुसरे लग्न केले होते. लग्नानंतर दोन- तीन महिनेच तिला चांगले वागविले. नंतर पतीसह सासरच्यांनी तिचा पैशासाठी छळ सुरू केला असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. घरातील कामधंदा येत नाही या कारणावरून रुख्मिणीचा खून करण्याची धमकी पतीने दिली.

तू हिला सोडून दे, तुला तिसरी करून देते, असे रुख्मिणीची सासू पांडुरंगाला म्हणायची. चारचाकी खरेदी करण्यासाठी माहेरवरून ३ लाख रुपये आण यासाठी तिचा सतत छळ करण्यात येत होता. ७ सप्टेंबर रोजी रात्री तिला पती, सासू, जाऊ, भावजय व नणंदने मारहाण केली. ८ सप्टेंबर रोजी तिला घराबाहेर हाकलले व पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नको, अशी धमकी दिली असे रुख्मिणीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी रुख्मिणीचा पती पांडुरंग बळीराम दादडे, सासू गोदावरी बळीराम दादडे, दीर समाधान बळीराम दादडे, जाऊ संगीता समाधान दादडे (सर्व. रा. डोंगरगावव, ता. चिखली) व नणंद संगीता पुंजाजी कान्हे (रा. सारशीव, ता. मेहकर) अशा ५जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.