दोघांना ताब्‍यात घेऊन 28 हजारांचा गुटखा पकडला, खामगाव तालुक्‍यात एलसीबीची कारवाई

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) खामगाव तालुक्यातील कंझारा फाट्यावर काल, 12 एप्रिलला दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 28 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. शेख कादिर शेख गुलामी (57, रा. कंझारा, ता. खामगाव), शेख शकिर शेख कादिर (20, रा. कंझारा ता. खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 28,616 रुपयांचा गुटखा पल्सर दुचाकी …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) खामगाव तालुक्‍यातील कंझारा फाट्यावर काल, 12 एप्रिलला दोघांना ताब्‍यात घेत त्‍यांच्‍याकडून 28 हजार रुपयांचा गुटखा जप्‍त केला.

शेख कादिर शेख गुलामी (57, रा. कंझारा, ता. खामगाव), शेख शकिर शेख कादिर (20, रा. कंझारा ता. खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्‍यांच्‍याकडून  28,616 रुपयांचा गुटखा पल्सर दुचाकी व मोबाइलसह एकूण 98,616 रुपयांचा माल जप्‍त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्‍पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्‍या आदेशाने ही कारवाई सहायक पोलीस निरिक्षक श्री. चतरकर, रघुनाथ जाधव, गजानन अहेर, दीपक पवार, संजय मिसाळ यांच्‍या पथकाने केली.