शीतलच्या आत्‍महत्‍येप्रकरणी सासू, सासऱ्याला अटक

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निमकवळा (ता. खामगाव) येथील २६ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध १३ जुलैला दुपारी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यातील सासू व सासऱ्याला काल, २० जुलैला अटक करण्यात आली. सौ. शीतल दिलीप भोसले (२६) हिने राहत्या घरात स्टोल स्लॅबला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगला बाबुराव गरड …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः निमकवळा (ता. खामगाव) येथील २६ वर्षीय विवाहितेच्‍या आत्‍महत्‍येप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध १३ जुलैला दुपारी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यातील सासू व सासऱ्याला काल, २० जुलैला अटक करण्यात आली.

सौ. शीतल दिलीप भोसले (२६) हिने राहत्या घरात स्टोल स्लॅबला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगला बाबुराव गरड (४२, रा. वाडी अदमपूर ता. तेल्हारा जि. अकोला) यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात तक्रार दिली होती. दोन्‍ही मुलीच झाल्याने सासरचे लोक शीतलचा चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करत होते. छळाला कंटाळून ती माहेरी आली. पण आईने समजावून तिला सासरी पाठवले होते. तेव्‍हा ती म्‍हणाली होती, मला पाठवू नकाे. माझ्या जिवाचे बरेवाईट होईल… झालेही तसेच होते. तिने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी सासू सौ. उषा महादेव भोसले, सासरा महादेव राजाराम भोसले, नणंद सौ. संगीता गोपाल जामधरे (सर्व रा. निमकवळा), नणंद सौ. कमला विठ्ठल यादव (रा. भौरज ता. जि. अकोला) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला होता. यातील सासू, सासऱ्याला काल पोलिसांनी अटक केली.