दोन अपघातांत दोन दुचाकीस्‍वार ठार, खामगाव तालुक्‍यातील दुर्घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्वार ठार झाले. पहिली घटना बाळापूर बायपासवरील डवरे पेट्रोलपंपासमोर काल, 30 मे रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास तर दुसरी घटना आज, 31 मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास खामगाव- शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्याजवळ घडली. पाण्याच्या वाहनाने उडवले… सुनील सारंगधर चेंडाळणे (44, रा. गजानन …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्‍वार ठार झाले. पहिली घटना बाळापूर बायपासवरील डवरे पेट्रोलपंपासमोर काल, 30 मे रोजी सायंकाळी सव्वा सहाच्‍या सुमारास तर दुसरी घटना आज, 31 मे रोजी सकाळी साडेनऊच्‍या सुमारास खामगाव- शेगाव रस्‍त्‍यावरील जयपूर लांडे फाट्याजवळ घडली.

पाण्याच्‍या वाहनाने उडवले…

सुनील सारंगधर चेंडाळणे (44, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, सुटाळपुरा, खामगाव) हे त्‍यांच्‍या हिरो कंपनीच्‍या ग्‍लॅमर मोटारसायकलने काल सायंकाळी बाळापूर बायपासकडून खामगावकडे येत असताना त्‍यांना डवरे पेट्रोलपंपासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पाण्याच्‍या छोट्या टँकरने उडवले. यात सुनील जागीच ठार झाला. या प्रकरणी सुनीलचा भाऊ अनिलने दिलेल्या तक्रारीवरून टँकरचालक भारत संतोष गायकवाड (19, रा. बाळापूर फैल, खामगाव) याच्‍याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. तपास पोहेकाँ गजानन जोशी करत आहेत.

कारने दुचाकीला उडवले

शेगाव पंचायत समितीत कार्यरत असलेले विश्वनाथ रामकृष्ण नेमाडे ( 43, रा. हिंगणा बैजनाथ ,ता. शेगाव) हे दुचाकीने आज सकाळी साडेनऊच्‍या सुमारास शेगाववरून खामगावकडे कामानिमित्त येत होते. त्‍यांना जयपूर लांडे फाट्याजवळ दुभाजक संपते तिथे समोरून येणाऱ्या भरधाव कारने उडवले. यात नेमाडे यांचा जागीच मृत्‍यू झाला.