दोन गुटखा विक्रेत्‍यांच्‍या खामगाव पोलिसांनी आवळल्‍या मुसक्‍या!; पावणे दोन लाखांचा माल जप्त

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध गुटखा विक्रीचे जाळे तोडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, खामगाव शहरात दोघांना पकडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल, 19 मार्चला दुपारी खामगाव शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकाँ गजानन बोरसे व संदीप टेकाळे यांनी कारवाई करून राहुल …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः अवैध गुटखा विक्रीचे जाळे तोडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, खामगाव शहरात दोघांना पकडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई काल, 19 मार्चला दुपारी खामगाव शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली.

खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकाँ गजानन बोरसे व संदीप टेकाळे यांनी कारवाई करून राहुल गजानन देशमुख (29, रा. घाटपुरी) व  श्याम सुरेश घाटे (19, रा. बोबडे कॉलनी, खामगाव)  यांना ताब्‍यात घेतले आहे.दुपारी 4 च्‍या सुमारास सरकी लाईन भागातील खरेदी विक्री कॉम्प्लेक्समध्ये बुऱ्हानी यांच्या दुकान क्रमांक 3 छापा मारून राहुल देशमुख याच्याकडून 1 लाख 32 हजार 315 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. दुसऱ्या घटनेत संध्याकाळी 6 च्या सुमारास भुसावळ चौकात श्याम घाटे हा मोटारसायकलवरून (क्र एमएच 28 एडी 8450) गुटख्याची विक्री करता वाहतूक करत असताना मिळून आला. त्याच्याजवळून मोटारसायकलसह 49 हजार 102 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.