दोन दारूड्यांचा कहर… किन्‍ही महादेव, सोनाळ्यात केला राडा!

खामगाव (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मंदिराच्या मागे लघुशंका करत असल्याबद्दल हटकल्याने दारूड्याने एकास दगडाने मारून जखमी केले. ही घटना 29 एप्रिलच्या रात्री 10 च्या सुमारास किन्ही महादेव (ता. खामगाव) येथे घडली. ज्ञानेश्वर पुंजाजी धनभर (27, रा. किन्ही महादेव) असे जखमी झालेल्या ग्रामस्थाचे नाव आहे. त्यांनी तक्रार हिवरखेड पोलिसांत तक्रार दिली, की गावात …
 

खामगाव (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मंदिराच्‍या मागे लघुशंका करत असल्याबद्दल हटकल्‍याने दारूड्याने एकास दगडाने मारून जखमी केले. ही घटना 29 एप्रिलच्‍या रात्री 10 च्‍या सुमारास किन्‍ही महादेव (ता. खामगाव) येथे घडली.

ज्ञानेश्वर पुंजाजी धनभर (27, रा. किन्ही महादेव) असे जखमी झालेल्या ग्रामस्‍थाचे नाव आहे. त्‍यांनी तक्रार हिवरखेड पोलिसांत तक्रार दिली, की गावात सागर वसंतराव देशमुख (ठाकरे, वय 32) हा दारूडा राहतो. तो विनाकारण गावात भांडण करत असतो. 29 एप्रिलच्‍या रात्री 10 ला तो मंदिरामागे लघवी करत होता. मंदिराजवळ लघवी करू नको, असे त्‍याला म्‍हटले असता त्याने शिविगाळ सुरू केली. माझ्या पाठीवर, कमरेजवळ जमिनीवरील दगड उचलून मारले. यात मी जखमी झालो. त्‍याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी शुभम बळीराम खेडकर याने त्याच्‍यापासून सोडवणूक केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

पलंगावरून बेदम मारहाण

संग्रामपूर ः  आठवडे बाजारात दुकान लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पलंगावरून एका दारूड्याने 45 वर्षीय व्‍यक्‍तीस काठीने बेदम मारहाण केली. ही घटना सोनाळा (ता. संग्रामपूर) येथे काल, 30 एप्रिलच्‍या सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास घडली.

भास्‍कर संपत तायडे यांनी घराशेजारी राहणाऱ्या बंडू जगदेव तायडेविरोधात तक्रार दिली आहे. बंडू दारू पितो व नेहमी लोकांना शिविगाळ करतो. गजानन मानपुत्रे हे आठवडी बाजारात दुकान लावण्यासाठी वापरत असलेला लोखंडी पलंग रविवारचा बाजार संपल्यानंतर भास्‍कर तायडेंच्‍या ताब्‍यात देतात. या पलंगावर भास्‍कर तायडे झोपत असतात. काल सायंकाळी घरासमोर त्‍यांना पलंग दिसला नाही. शोध घेतला तेव्हा पलंग बंडूच्‍या घरासमोर दिसला. बंडू पलंगावर बसलेला होता. बंडूला तो पलंग मानपुत्रे यांनी माझ्या ताब्‍यात दिल्याचे भास्‍कर यांनी सांगितले. मात्र हा पलंग तुझ्या मालकीचा नाही असे म्हणून बंडू शिविगाळ करू लागला. यातून वाद वाढून बंडूने काठीने भास्‍कर यांना मारहाण केली. यात भास्‍कर जखमी झाले. पुन्‍हा पलंग मागायला आला तर जीवाने संपवून टाकेन, अशी धमकीही त्‍याने दिली. त्‍यावरून पोलिसांनी बंडूविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.