दोन दिवसांत 2 तरुणींसह 1 महिला जिल्ह्यातून गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, 19 मे आणि आज, 20 मे या दोन दिवसांत जिल्ह्यातून 2 तरुणींसह 1 महिला बेपत्ता झाली आहे. त्या हरवल्याची तक्रार त्या त्या पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. आज हरसोडा नवीन (ता. मलकापूर) येथील मेघा कैलास निकम (19) ही घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. ती हरवल्याची तक्रार तिच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काल, 19 मे आणि आज, 20 मे या दोन दिवसांत जिल्ह्यातून 2 तरुणींसह 1 महिला बेपत्ता झाली आहे. त्‍या हरवल्याची तक्रार त्‍या त्‍या पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

आज हरसोडा नवीन (ता. मलकापूर) येथील मेघा कैलास निकम (19) ही घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. ती हरवल्याची तक्रार तिच्‍या घरच्‍यांनी मलकापूर एमआयडी पोलीस ठाण्यात केली आहे. पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथील सौ. लक्ष्मी अरुण पारधी (35) ही महिलाही बेपत्ता झाली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे. काल मेहकर येथील रामनगर जनता हायस्कूल परिसरात राहणारी मनिषा संजय भांगडिया (24) ही तरुणी घरातून निघून गेली आहे. मेहकर पोलीस तिचा शोध घेत आहेत.