दोन दुचाकींची जबर धडक; तिघे गंभीर जखमी; मलकापूर तालुक्यातील दुर्घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन दोन्ही दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना मलकापूर-बुलडाणा रोडवरील निंबारी फाट्यानजीक काल, 22 मे रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास घडली. अपघातग्रस्त दुचाकी व जखमी रोडवर बराच वेळ पडून असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सागर बेलोकार, नितेश काकडे, चेतन टेकाडे, …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन दोन्ही दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना मलकापूर-बुलडाणा रोडवरील निंबारी फाट्यानजीक काल, 22 मे रोजी सायंकाळी 7:30 च्‍या सुमारास घडली. अपघातग्रस्‍त दुचाकी व जखमी रोडवर बराच वेळ पडून असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सागर बेलोकार, नितेश काकडे, चेतन टेकाडे, अमोल टप, संदीप राजपूत आदींनी निमखेडचे सरपंच प्रवीण क्षीरसागर यांच्या गाडीतून मलकापूरच्‍या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

शिराढोण (ता. मलकापूर) येथील गजानन नामदेव पाटील हे त्यांच्या हिरो होंडा शाइन दुचाकीने (क्र. MH 28 BL 8223) मलकापूरकडून शिराढोणकडे जात होते तर त्‍याचवेळी बुलडाणा येथून प्रवीण सुपडा वानखेडे (22), योगेश विजय मोरे (20, दोघे रा. वृंदावननगर, मलकापूर) हे दुचाकीने (क्र. MH 28 AH 6848) औषधी घेऊन बुलडाणावरून मलकापूरकडे येत होते. दोन्ही दुचाकींची निंबारी फाट्यानजीक धडक झाली. यात गजानन नामदेव पाटील यांच्या डोक्याला मार लागला तर प्रवीण वानखेडे, योगेश मोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ मलकापूरच्‍या उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

अपघाताची माहिती मिळताच पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असलेले गजानन ठोसर, विरसिंह राजपूत, राजेश इंगळे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जखमींच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. गजानन नामदेव पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव (खानदेश) येथे हलविण्यात आले तर प्रविण वानखेडे, योगेश मोरे यांना डॉ. अरविंद कोलते यांच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रसिंह ठाकूर करत आहेत.