दोन दुचाकींच्‍या धडकेत युवक ठार, एक गंभीर जखमी, शेगावजवळील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव- खामगाव मार्गावर २ जूनच्या रात्री उशिरा देशमुख पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकींत जोरदार धडक होऊन चिंचोली येथील २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. शेगावपासून जवळच असलेल्या देशमुख पेट्रोलपंपाजवळ चिंचोली येथील ऋषिकेश शिवशंकर गीते (22) आणि दुसरा दुचाकीस्वार (त्याचे नाव कळू शकले नाही.) असे दोघे जण गंभीर जखमी झाले. …
 
दोन दुचाकींच्‍या धडकेत युवक ठार, एक गंभीर जखमी, शेगावजवळील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव- खामगाव मार्गावर २ जूनच्या रात्री उशिरा देशमुख पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकींत जोरदार धडक होऊन चिंचोली येथील २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला.

शेगावपासून जवळच असलेल्या देशमुख पेट्रोलपंपाजवळ चिंचोली येथील ऋषिकेश शिवशंकर गीते (22) आणि दुसरा दुचाकीस्वार (त्‍याचे नाव कळू शकले नाही.) असे दोघे जण गंभीर जखमी झाले. सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दोघांना उपचारसाठी आणले असता कर्तव्यावरील डॉक्टरांनी ऋषिकेश गीते याला तपासून मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्‍यातर्फे कक्ष सेवक कैलास दत्तू घाटे याने दिलेल्या मेमोवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पीएसआय नितीनकुमार इंगोले करीत आहेत.