दोन नंबरच्या धंद्याचा आरोप झालेल्या चितोडामध्ये देशी दारू पकडली; 45 हजारांचा मुद्देमाल जप्‍त

बुलडाणा ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः वाघ व हिवराळे कुटुंबातील वादाने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला आलेल्या चितोडा गावात आज, 29 जूनला संध्याकाळी 5:45 वाजता पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक केली जाणारी देशी दारू जप्त केली. खासदार प्रतापराव जाधव यांनी या गावात दोन नंबरचे धंदे जोमात सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या …
 
दोन नंबरच्या धंद्याचा आरोप झालेल्या चितोडामध्ये देशी दारू पकडली; 45 हजारांचा मुद्देमाल जप्‍त

बुलडाणा ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः वाघ व हिवराळे कुटुंबातील वादाने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला आलेल्या चितोडा गावात आज, 29 जूनला संध्याकाळी 5:45 वाजता पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक केली जाणारी देशी दारू जप्‍त केली. खासदार प्रतापराव जाधव यांनी या गावात दोन नंबरचे धंदे जोमात सुरू असल्याचा आरोप केला होता. त्‍यामुळे पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्‍या पथकाने या गावावर लक्ष केंद्रीत केले आहे.

संतोष श्यामराव ठोसर (45, रा. पळशी बुद्रूक) हा विनापरवाना दारू घेऊन जाताना चितोडा येथील मस नदीच्या पुलाजवळ पोलिसांनी पकडले. त्याच्याजवळून देशी दारूच्या 180 मिलीच्या 96 नग शिशा किंमत 5 हजार 760 रु व दोन कापडी थैल्या किंमत 20 रुपये आणि दुचाकी किंमत 40 हजार असा एकूण 45 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्‍या पथकाचे पो. ना. सुधाकर थोरात यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तशी फिर्याद दिली. तपास पोहेकाँ गणेश जाधव करीत आहेत.